महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

INDvAUS: रखरखत्या उन्हात कांगारुंचा सराव

भारतात ऑस्ट्रेलिया संघाचा टी-२० क्रिकेटमधला विक्रम चांगला नाही. त्याने येथे १८ पैकी ६ सामने जिंकता आले आहे. भारताने २००७, २०१३ आणि २०१६ मध्ये झालेल्या टी-२० मालिकेत कांगारुंना पाणी पाजले आहे.

By

Published : Feb 22, 2019, 9:47 PM IST

ऑस्ट्रेलिया

हैदराबाद - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना २४ फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलिया संघाने रखरखत्या उन्हात कसून सराव केला. या उन्हाने कांगारु चांगलेच हैराण झाले आहेत.

दोन्ही संघात पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा संघ हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सराव करत आहे. भारतीय हवामानाशी जुळवून घेण्यासाठी कांगारुनी सरावासाठी हैदराबाद हे ठिकाण निवडले आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियास २ टी-२० सामने तर ५ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.

नुकत्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी २-१ आणि एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली तर टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. या पराभवाचा बदला घेण्यासाठी कांगारु जोरदार तयारीला लागले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या सरावाचे काही व्हिडिओ टि्वटरवरुन शेअर केले आहे. आरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, उस्मान ख्वाजा सारखे धुरंधर खेळाडू फलंदाजीचा सराव केला.

भारतात ऑस्ट्रेलिया संघाचा टी-२० क्रिकेटमधला विक्रम चांगला नाही. त्याने येथे १८ पैकी ६ सामने जिंकता आले आहे. भारताने २००७, २०१३ आणि २०१६ मध्ये झालेल्या टी-२० मालिकेत कांगारुंना पाणी पाजले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details