मुंबई - सध्या संपूर्ण देशाला कोरोना व्हायरसचा सामना करावा लागत आहे. या लढाईसाठी अनेकजण विविध मार्गाने उपाययोजना करत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयही या लढाईत मागे राहिलेले नाही. सरकारने प्रत्येकाला मास्क घालून बाहेर जाण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन आणखी बळकट करण्यासाठी बीसीसीआयने एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणजेच ‘मास्क फोर्स’ने लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
टीम इंडिया बनली ‘मास्क फोर्स’...पाहा व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये कर्णधार विराट कोहली, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, स्मृती मंधाना, रोहित शर्मा, हरभजन सिंग, महिला संघाचा कर्णधार हरमनप्रीत कौर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, मिताली राज आणि सचिन तेंडुलकर दिसत आहेत. बीसीसीआयने ट्विटरवर लिहिले, की टीम इंडिया आता टीम मास्कफोर्स बनली आहे.
टीम इंडिया बनली ‘मास्क फोर्स’...पाहा व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये कर्णधार विराट कोहली, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, स्मृती मंधाना, रोहित शर्मा, हरभजन सिंग, महिला संघाचा कर्णधार हरमनप्रीत कौर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, मिताली राज आणि सचिन तेंडुलकर दिसत आहेत. बीसीसीआयने ट्विटरवर लिहिले, की टीम इंडिया आता टीम मास्कफोर्स बनली आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत सामील व्हा. सेतुआरोग्य मोबाइल अॅप डाउनलोड करा. बीसीसीआयने यापूर्वी कोरोना व्हायरस विरूद्ध लढ्यात ५१ कोटींची मदत केली आहे.