महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वेळेच्या आधीच बुमराने साजरे केले रक्षाबंधन, कारण...

बुमराहने आपली बहीण जुहीकाकडून राखी बांधून घेतली. त्यांचा हा गोड क्षण बुमराहने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

वेळेच्या आधीच बुमराने साजरे केले रक्षाबंधन, कारण...

By

Published : Aug 14, 2019, 12:22 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाचा प्रमूख गोलंदाज जसप्रीत बुमराहने मंगळवारीच रक्षाबंधन साजरे केले. भलेही या सणाला दोन दिवस बाकी होते. पण, त्याने आधीच हा सण साजरा केला. कारण, बुमराहला आगामी कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडीजला रवाना व्हायचे आहे.

बुमराहने आपली बहीण जुहीकाकडून राखी बांधून घेतली. त्यांचा हा गोड क्षण बुमराहने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या पोस्टबरोबर बुमराने एक कॅप्शनही दिले. बुमराह म्हणाला, 'भारतीय संघासाठीचे कर्तव्य म्हणून मी या रक्षाबंधनला इथे असणार नाही. पण, जुहीका मी हा सण मी चुकवू शकत नाही. माझी नेहमी साथ देण्यासाठी धन्यवाद.'

वेस्ट इंडीज दौऱ्याच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे २२ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बुमराह भारतीय संघात सामिल होणार आहे. पहिला कसोटी सामना अँटिग्वाला तर, दुसरा सामना ३० ऑगस्टला जमैका येथे सुरु होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details