जमैका - वेस्ट इंडिजविरुध्दच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची धमाकेदार सुरुवात करण्याचा दृष्टीने भारतीय संघाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या सामन्यांपूर्वी भारताच्या खेळाडूंनी तीन दिवसीय सराव सामन्यात वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजीत हात साफ केले. हा सामना अनिर्णित राहिला असला तरी, खेळाडूंने मनोबल वाढले आहे.
मागील काही दिवसांपासून फॉर्मात नसलेला, भारताचा भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने सराव सामन्याच्या शेवटच्या दिवशी अर्धशतकी खेळी करत आपण फार्मात आले असल्याचे संकेत दिले आहे. तसेच या सामन्यातील पहिल्या डावामध्ये चेतेश्वर पुजारा याने शतक (१००) तर रोहित शर्माने (६८) धावा ठोकत भारतीय फलंदाजी बहरली असल्याचे संकेत दिले आहेत.