महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup: न्यूझीलंडने उडवला भारताचा धुव्वा, ब्लॅककॅप्सचा ६ गडी राखून विजय

न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ तर जेम्स निशामने ३ गडी माघारी धाडत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले

By

Published : May 25, 2019, 10:09 PM IST

Updated : May 25, 2019, 11:29 PM IST

New Zealand

लंडन -द ओव्हल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या भारताविरुद्धच्या सराव सामन्यात न्यूझीलंडने ६ गडी राखून भारताचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताकडून रवींद्र जडेजाच्या ५४ धावा वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नसल्याने भारताचा डाव अवघ्या १७९ धावांमध्ये गुंडाळला.

ट्रेंट बोल्ट

पाचव्या स्थानी फलंदाजीस अलेल्या हार्दिकने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तो ३० धावांवर बाद झाल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या दोघांव्यतिरिक्त विराटने १८, धोनीने १७ तर कुलदीपने १९ धावा केल्या. न्यूझीलंडसाठी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ तर जेम्स निशामने ३ गडी माघारी धाडत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले.

भारताने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने ३८ व्या षटकामध्ये ६ गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विल्यमसनने ६७ तर रॉस टेलरने ७१ धावांची शानदार अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

भारताचा दुसरा सराव सामना २८ मे रोजी बांगलादेशशी होणार आहे. तर विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Last Updated : May 25, 2019, 11:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details