महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लंडचा भारतावर सहा गडी राखून विजय

इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो (१२४) आणि जेसन रॉय (५५) यांनी ११० धावांची सलामी दिली. त्यानंतर बेन स्टोक्सने तुफान फटकेबाजी करत १० षटकार आणि ४ चौकारांची आतशबाजी केली आणि ५२ चेंडूत ९९ धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने २ तर भुनवेश्वरने १ गडी बाद केला.

By

Published : Mar 26, 2021, 10:55 PM IST

इंग्लंडचा भारतावर सहा गडी राखून विजय
इंग्लंडचा भारतावर सहा गडी राखून विजय

पुणे- भारतीय संघाने दिलेल्या ३३७ धावांचे मोठे आव्हान इंग्लंडच्या संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात लिलया पार केले. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो (१२४) आणि जेसन रॉय (५५) यांनी ११० धावांची सलामी दिली. त्यानंतर बेन स्टोक्सने तुफान फटकेबाजी करत १० षटकार आणि ४ चौकारांची आतशबाजी केली आणि ५२ चेंडूत ९९ धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने २ तर भुनवेश्वरने १ गडी बाद केला.

भारताच्या 337 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉयने दमदार सुरुवात केली. पहिल्या सामन्याप्रमाणे या दोघांनी चमकदार खेळ करत संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. अखेर फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रॉय धावबाद झाला. त्याने 7 चौकार आणि एका षटकारासह 55 धावांची खेळी केली. रॉय बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स आणि बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. 25 षटकात इंग्लंडने 1 बाद 167 धावांपर्यंत मजल मारली. संघाला दोनशेपार पोहोचवल्यानंतर बेअरस्टोने कुलदीपला षटकार खेचत आपले शतक पूर्ण केले. बेअरस्टोच्या शतकानंतर बेन स्टोक्सने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर स्टोक्सने भारतीय गोलंदाजांची धुलाई करण्याल सुरुवात केली. कुलदीप यादवच्या एका षटकात स्टोक्सने सलग तीन षटकार ठोकले. स्टोक्स 99 धावांवर असताना भुवनेश्वर कुमारने त्याला झेलबाद केले. स्टोक्सने 52 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांची आतषबाजी केली.

तत्पूर्वी, के.एल. राहुलने फॉर्ममध्ये येत केलेली शतकी खेळी आणि ऋषभ पंतने त्याला दिलेली साथ याच्या बळावर भारताने इंग्लंडसमोर ३३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनीही हा निर्णय सार्थ ठरवत भारताची चांगलीच दमछाक केली. मागील सामन्यातील सामनावीर शिखर धवनला रीस टोप्लेने चौथ्याच षटकात बाद केले. त्यानंतर हिटमॅन रोहित शर्माही फॉर्ममध्ये वाटत असतानाच अचानक बाद झाला. त्यानंतर कोहली आणि के. एल. राहुलने काही प्रमाणात डाव सावरत भारताची धावसंख्या १५० पर्यंत नेली. कोहली शतक करेल असे वाटत असतानाच, ३२व्या षटकात आदिल रशीदने त्याला बाद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details