नवी दिल्ली - टी-२० मध्ये दीपक चहरने नाही तर एकता बिष्टने भारतासाठी पहिली हॅट्ट्रिक साधली आहे. दीपक चहरने बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक सामन्यात हॅट्ट्रिकसह ६ गडी बाद केले होते. तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन चहर टी-२० मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला असल्याचे ट्विट केले. यानंतर मात्र, नेटीझन्ससह अखिल भारतीय महिला काँग्रेसने बीसीसीआयला धारेवर धरले.
बीसीसीआयच्या त्या ट्वीटनंतर अखिल भारतीय महिला काँग्रेससह ट्विटर यूजर्संनी चाहरच्या आधी आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एकता बिष्टने हॅटट्रिक घेतली होती असे खडेबोल सुनावले.