महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 29, 2019, 8:57 PM IST

ETV Bharat / sports

श्रीसंतला लोकसभा निवडणुकीत शशी थरुर यांचा पराभव करायचांय

श्रीसंतने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात तो म्हणतो, 'मी आगामी लोकसभा २०२४ ची निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी इच्छुक आहे. मला काँग्रेसचे शशी थरुर यांचा पराभव करायचा आहे. तसे मला व्यक्तीगत शशी थरुर आवडतात. ते माझ्या वाईट काळात माझ्यासोबत राहिले. पण मला त्यांना पराभूत करायला आवडेल. मी तिरुवनंतपुरममध्ये त्यांना सहज हरवू शकतो, यात काही प्रश्नच नाही, असा विश्वास श्रीसंतचा आहे.

श्रीसंतला लोकसभा निवडणुकीत शशी थरुर यांचा पराभव करायचंय

तिरुवनंतपुम- आपल्या छोडेखानी क्रिकेट करियरमध्ये सतत विवादीत विषयावरून चर्चेत असणारा भारतीय वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंत मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाला मागे सारत तो मैदानात उतरण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तो कठोर परिश्रम घेत आहे. मात्र, क्रिकेटच्या मैदानासोबत श्रीसंतची नजर राजकीय फडावरही असून, तो आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे.

श्रीसंतने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात तो म्हणतो, 'मी आगामी लोकसभा २०२४ ची निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी इच्छुक आहे. मला काँग्रेसचे शशी थरुर यांचा पराभव करायचा आहे. तसे मला व्यक्तीगत शशी थरुर आवडतात. ते माझ्या वाईट काळात माझ्यासोबत राहिले. पण मला त्यांना पराभूत करायला आवडेल. मी तिरुवनंतपुरममध्ये त्यांना सहज हरवू शकतो, यात काही प्रश्नच नाही, असा विश्वास श्रीसंतचा आहे.

हेही वाचा ःयुवीच्या 'चिकना चमेला' लूकवर सानिया मिर्झाचे मजेशीर कमेंट

दरम्यान, यापूर्वी श्रीसंतने २०१६ साली केरळ विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली आहे. मात्र, या निवडणुकीत श्रीसंतचा पराभव झाला होता. तिरुवनंतपुरममध्ये शशी थरुर यांनी लोकसभा निवडणुकीत विजयाची 'हॅट्रिक' साधलेली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत थरुर या मतदारसंघातून १० हजार मतांनी निवडून आले होते. त्यानंतर २०१९ लोकसभा निवडणुकीत थरुर यांनी याच मतदारसंघात तब्बल १ लाख मतांनी बाजी मारलेली आहे.

हेही वाचा ःरवी शास्त्रींचे पद धोक्यात, कपिल देवच्या CAC ला नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details