महाराष्ट्र

maharashtra

शाहरुख म्हणतो, कोरोनाचा लवकरच 'दी एन्ड' अन् आयपीएलचा थरार सुरू

पुढील काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होईल आणि आपल्याला आयपीएलचा थरार अनुभवता येईल. सरकार, बीसीसीआय तसेच सर्व संघाचे सहमालक परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत, असेही शाहरुख म्हणाला.

By

Published : Mar 14, 2020, 5:26 PM IST

Published : Mar 14, 2020, 5:26 PM IST

hope covid 19 subsides and show goes on kkr co owner shah rukh khan on ipl
शाहरुख म्हणतो, कोरोनाचा लवकरच 'दी एन्ड' अन् आयपीएलचा थरार सुरू

मुंबई- कोरोना विषाणू लवकरच आटोक्यात येईल आणि आयपीएलचा थरार आपल्याला पुन्हा पाहता येईल, अशी आशा कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सहमालक आणि बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने व्यक्त केली आहे. त्यानं बीसीसीआयच्या बैठकीनंतर ट्विटव्दारे आपलं मत व्यक्त केलं.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द तसेच काही स्पर्धेचे आयोजन लांबणीवर टाकण्यात येत आहे. बीसीसीआयनेही २९ मार्चपासून सुरू होणारी इंडियन प्रिमीअर लीग स्पर्धा पुढे ढकलली असून ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी बीसीसीआयने एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाच्या संघमालकांनाही उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. केकेआर संघाचा सहमालक शाहरुखही या बैठकीला हजर होता.

बीसीसीआयच्या बैठकीनंतर शाहरुख खानने एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'मैदानाबाहेर सगळ्या संघाच्या सहमालकांना भेटून आनंद झाला. चाहते, खेळाडू तसेच शहराची सुरक्षा याचे महत्व सगळ्यात पहिलं आहे. आपल्याला आरोग्य संस्था तसेच सरकारच्या सूचनांचे पालन करणे, आवश्यक आहे.'

पुढील काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होईल आणि आपल्याला आयपीएलचा थरार अनुभवता येईल. सरकार, बीसीसीआय तसेच सर्व संघाचे सहमालक परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत, असेही शाहरुख म्हणाला.

दरम्यान, चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूमुळे जगभरातील ५ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला आहे. भारतात ८२ हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून आरोग्य आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा -फुटबॉलपटू रोनाल्डोच्या मित्राला कोरोनाने ग्रासले

हेही वाचा -IPL पेक्षा लोकांचा जीव महत्वाचा, किंग्ल इलेव्हन पंजाबच्या सहमालकाचे वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details