महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND VS ENG : रामनाथ कोविंदसह मान्यवरांनी केलं टीम इंडियाचे अभिनंदन

अखेरचा सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकत भारतीय संघाने चार सामन्याच्या मालिकेत इंग्लंडचा ३-१ ने धुव्वा उडवला. तसेच भारतीय संघाने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. लंडनच्या ऐतिहासिक लॉड्स मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात महामुकाबला होणार आहे. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून भारतीय संघावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह मान्यवरांनी भारतीय संघाचे कौतूक केलं आहे.

By

Published : Mar 6, 2021, 8:40 PM IST

india-vs-england-netizens-celebrate-as-team-india-finish-on-top-of-icc-wtc-standings
IND VS ENG : रामनाथ कोविंदसह मान्यवरांनी केलं टीम इंडियाचे अभिनंदन

अहमदाबाद - येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेला चौथा आणि अखेरचा कसोटी सामना भारतीय संघाने तीनच दिवसात जिंकला. एक डाव आणि २५ धावांनी हा सामना जिंकत भारतीय संघाने चार सामन्याच्या मालिकेत इंग्लंडचा ३-१ ने धुव्वा उडवला. तसेच भारतीय संघाने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. लंडनच्या ऐतिहासिक लॉड्स मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात महामुकाबला होणार आहे. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून भारतीय संघावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह माजी क्रिकेटपटू तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय संघाचे कौतूक केलं आहे.

हेही वाचा -WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार

भारताच्या विजयानंतर मान्यवरांनी केलेले ट्विट...

भारताने असा जिंकला सामना -

इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ऋषभ पंतचे शतक आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६ धावांच्या जोरावर ३६५ धावा करून १६० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव भारतीय फिरकीपुढे गडगडला. आर अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांवर गुंडाळला आणि भारताने हा सामना १ डाव २५ धावांनी जिंकला. अक्षर पटेलने ४८ धावांत पाच विकेट घेतल्या, तर आर अश्विननेही ४७ धावांत पाच बळी टिपले. पहिल्या डावात शतक झळकावणारा ऋषभ पंत सामनावीर ठरला. तर अश्विनला मालिकावीरच्या पुरस्कराने गौरविण्यात आले.

हेही वाचा -IND Vs ENG : राहुल गांधींनी टीम इंडियाचं केलं अभिनंदन

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details