मुंबई- टीम इंडियाचा 'हिटमॅन' खेळाडू रोहित शर्माचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे चाहते, सहकारी खेळाडूंकडून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. रोहित क्रिकेट विश्वात स्फोटक फलंदाजी तसेच हटक्या स्टाईलमुळे म्हणून ओळखला जातो. त्याची पर्सनल लाईफही हटकेच आहे. कारण रोहित अन् रितिका यांच्या लग्नाची गोष्ट एका बॉलीवूड चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे.
रितिका ही भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहची मानलेली बहिण. रितिका रोहितची मॅनेजर म्हणून काम पाहत असे. रोहित व रितिका कामाच्या निमित्ताने एकमेकांशी भेटायचे. असेच जवळपास सहा वर्षांपर्यत चाललं. रितिका ही स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर होती आणि ती रोहितच्या सर्व मिटींग याची नोंद ठेवायची. नंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.
रोहितने मुंबईच्या बोरीवली स्पोर्ट्स अॅकडमीमध्ये गुडघ्यावर बसून हातात रिंग घेत रितिकाला लग्नाची मागणी घातली. रितिकानंही त्याला होकार दिला. महत्वाचे म्हणजे रोहितने याच अॅकडमीतून क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केली.