मुंबई- पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर, भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि भाजप खासदार गौतम गंभीरने शाहिद आफ्रिदीला चांगलेच सुनावले. त्याने, १६ वर्षाचा म्हणून आफ्रिदीची खिल्लीही उडवली आहे.
गंभीरने ट्विटच्या माध्यमातून शाहिद आफ्रिदीची खिल्ली उडवली. त्याने पाकिस्तानजवळ ७ लाख सैन्य असून २० कोटी लोकं या सैन्याच्या पाठीशी आहेत, असे १६ वर्षीय शाहिद आफ्रिदी म्हणत आहे. असे असून देखील मागील ७० वर्षांपासून काश्मीरसाठी भीक मागत आहेत, अशा शब्दात गंभीरने उत्तर आफ्रिदी दिले आहे.
गंभीरने त्याच्या ट्विटमध्ये पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यावर निशाणा साधला आहे. गंभीरने आफ्रिदी, इम्रान खान, बाजवा यांचा उल्लेख जोकर असा केला आहे. हे तिघे मोदी यांच्याबद्दल विष पसरवण्याचा काम करत आहेत. यातून ते पाकच्या लोकांना मूर्ख बनवत आहेत, पण निर्णय येईपर्यंतही काश्मीर तुम्हाला मिळणार नाही. बांगलादेश लक्षात आहे ना? असेही त्याने म्हटलं आहे.