महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात अश्विनला स्थान द्या - गौतम गंभीर

रविचंद्रन अश्विनकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव

रविचंद्रन अश्विन

By

Published : Apr 11, 2019, 6:28 PM IST

नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने २०१९ च्या आयसीसी विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला स्थान द्यायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.

गौतम गंभीर


गंभीर म्हणाला, ' रविचंद्रन अश्विनकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. तसेच त्याने २ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आगामी विश्वचषक जिंकण्यात त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला नक्कीच होऊ शकतो.'


अश्विनने आतापर्यंत भारतासाठी १११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने २००११ व २०१५ ची विश्वचषक स्पर्धेतही भारतीय क्रिकेट संघासाठी खेळला आहे. अश्विनने भारतासाठी शेवटचा वनडे सामना हा २०१७ साली वेस्टइंडीजविरुद्ध खेळला होता.


भारतीय क्रिकेट निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांच्या नेतृत्वात १५ एप्रिलला मुंबई येथे इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. जाहीर होणाऱ्या विश्वचषकासाठीच्या संघात कोणत्या क्रिकेटपटूंना संघात स्थान मिळणार याबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details