नवी दिल्ली -आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत टीम इंडियाची उपांत्य सामन्यात 'एक्झिट' झाली. या पराभवानंतर कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या गेल्या. अनेक क्रिकेटपंडितांनी त्यावर भाष्यसुद्धा केले. आता भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभारनेही धोनीच्या निवृत्तीबाबत मत व्यक्त केले आहे. गंभीरने भावनिक नाही तर व्यावहारिकदृष्ट्या विचार करणे गरजेचे आहे, असे त्याने म्हटले आहे.
धोनी म्हणाला होता.. मी, सचिन आणि सेहवाग ऑस्ट्रेलियात खेळू शकत नाही; गौतम गंभीरचा धक्कादायक खुलासा
गंभीरने धोनीच्या निवृत्तीबाबत भावनिक नाही तर व्यावहारिकदृष्ट्या विचार करणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.
गंभीर म्हणाला, 'धोनी भारतीय संघाचा कर्णधार असताना त्याने नेहमी कठोर पावले उचलली होती. त्यामुळे आता भविष्यात डोकावणे महत्त्वाचे आहे. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियात मैदाने मोठी असल्याच्या कारणाने मी, सचिन आणि सेहवाग ऑस्ट्रेलियात खेळू शकत नाही, असे धोनी म्हणाला होता. त्याने 2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी नवीन तरुण खेळाडू संघात आणले होते.'
गंभीर पुढे म्हणाला, 'आकड्ंयावर नजर टाकली तर धोनी नक्कीच उत्कृष्ट खेळाडू म्हणून सिद्ध होईल. पण याचा अर्थ इतर कर्णधार वाईट होते असे नाही, सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली आपण परदेशात मालिका जिंकल्या. तर कोहलीच्या संघाने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. आपण दोन विश्वकरंडक नक्की उंचावले पण त्यात एकट्या धोनीचे महत्व नव्हते. सर्व खेळांडूचे त्यात योगदान होते.'