लंडन -विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानला आपल्यात पहिल्याच वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले होते. या मोठ्या पराभवानंतर पाक संघ आणि कर्णधार सर्फराज अहमदवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. मात्र, पाकचा माजी दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदीने पाक क्रिकेट संघाचा बचाव करताना म्हटले आहे, की कुणी काहीही म्हणो, यंदाची विश्वकरंडक स्पर्धा पाकिस्तानच जिंकणार आहे.
गिरे भी तो टांग उपर; पाकचा 'हा' खेळाडू म्हणतो विश्वकरंडक आम्हीच जिंकणार
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयश्री प्राप्त करून पाक संघाने आपला आत्मविश्वास वाढवावा - शाहिद आफ्रिदी
आफ्रिदीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 'मला पाक संघातील प्रत्येक खेळाडूच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असून यंदाची विश्वकरंडक स्पर्धा पाकिस्तानच जिंकेल. चांगल्या कामगिरीसाठी कर्णधार सर्फराजसह संघातील सर्व खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयश्री प्राप्त करून पाक संघाने आपला आत्मविश्वास वाढवावा, असेही तो म्हणाला'
विश्वकरंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा संपूर्ण संघ वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १०५ धावांमध्ये गारद झाला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने १३.४ षटकांमध्ये ३ गडी गमावत विजय साजरा केला होता.