महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'अनोखी' हॅट्ट्रिक नोदवणाऱ्या मर्व ह्युजेस यांना 'हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान

मर्व ह्युजेस यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यांना २००५ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे निवडकर्ते बनवण्यात आले होते. २०१० पर्यंत ते या पदावर होते.

By

Published : Feb 2, 2021, 1:37 PM IST

Merv Hughes
Merv Hughes

मेलबर्न -माजी वेगवान गोलंदाज मर्व ह्युजेस यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) आज मंगळवारी ही घोषणा केली.

मर्व ह्युजेस

ह्युजेस यांनी १९८५ ते १९९४ पर्यंत ऑस्ट्रेलियाकडून ५३ कसोटी आणि ३३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात त्यांनी २१२ फलंदाजांना माघारी धाडले. ८७ धावांत ८ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. १९८८ मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता.

हेही वाचा - तब्बल १२ वर्षानंतर 'या' आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला खेळायचंय आयपीएल!

या कारनाम्यासोबत ह्युजेस यांनी याच सामन्यात हॅट्ट्रिकही नोंदवली होती. विशेष म्हणजे, ही हॅट्ट्रिक दोन वेगवेगळ्या दिवसात, दोन डावात आणि तीन षटकात घेतली. त्यांनी ३३ एकदिवसीय सामन्यात ३८ बळी टिपले आहेत. ''हॉल ऑफ फेमचा सन्मान मिळाल्यामुळे मी खूप खूष आहे'', असे ५९ वर्षीय ह्युजेस यांनी सांगितले.

२००५ मध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया संघाचे निवडकर्ते बनवण्यात आले होते. २०१० पर्यंत ते या पदावर होते.

ABOUT THE AUTHOR

...view details