महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लंडचा फिरकीपटू अमर पाहतोय कसोटी पदार्पणाचे स्वप्न

अमर म्हणाला, "अर्थात, मला पहिल्या कसोटी सामन्यात खेळायचे आहे आणि संघात सामील व्हायचे आहे. जर मी ते करू शकलो नाही तर कदाचित मी येथे नसायला हवे." अमरने आतापर्यंत प्रथम श्रेणीच्या 29 सामन्यात 69 विकेट्स घेतल्या आहेत. 2018 मध्ये काऊंटी चॅम्पियनशिप जिंकणार्‍या सरे संघाचा तो सदस्य होता.

By

Published : Jun 27, 2020, 6:29 PM IST

England spinner amar virdi is eyeing his debut Test
इंग्लंडचा फिरकीपटू अमर पाहतोय कसोटी पदार्पणाचे स्वप्न

मँचेस्टर - इंग्लंडचा 21 वर्षीय फिरकीपटू अमर विर्दीचे लक्ष पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पणाकडे लागले आहे. अमर हा वेस्ट इंडीजविरूद्ध सुरू होणार्‍या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या 30 सदस्यीय प्रशिक्षण गटाचा एक भाग आहे. ही मालिका 8 जुलैपासून सुरू होईल.

अमर म्हणाला, "अर्थात, मला पहिल्या कसोटी सामन्यात खेळायचे आहे आणि संघात सामील व्हायचे आहे. जर मी ते करू शकलो नाही तर कदाचित मी येथे नसायला हवे." अमरने आतापर्यंत प्रथम श्रेणीच्या 29 सामन्यात 69 विकेट्स घेतल्या आहेत. 2018 मध्ये काऊंटी चॅम्पियनशिप जिंकणार्‍या सरे संघाचा तो सदस्य होता.

अमरला इंग्लंडच्या संघात स्थान मिळवण्यासाठी मोईन अली, जॅक लीच, डोम बेस आणि मॅट पार्किन्सन याxसारख्या अनुभवी खेळाडूंना पराभूत करावे लागेल. तो म्हणाला, "मला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. मी जे करण्यास सक्षम आहे ते लोकांना दाखवायचे आहे. मला माझा स्वत:चा अभिमान आहे. माझ्यासाठी पुढील पायरी म्हणजे कसोटीत स्थान मिळवणे. मी कठोर परिश्रम करत राहीन."

उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना हॅम्पशायरच्या एजेस बाऊलवर, तर दुसरा व तिसरा सामना ओल्ड ट्रॅफर्ड ग्राऊंडवर खेळला जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details