महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिपक चहरने रचला नवा विक्रम, ४ षटकांमध्ये टाकले तब्बल २० डॉट बॉल्स

आयपीएलच्या इतिहासात एका गोलंदाजांने टाकलेले हे सर्वाधिक डॉट बॉल्स आहेत

दिपक चहर

By

Published : Apr 10, 2019, 5:12 PM IST

चेन्नई - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील एका डावात सर्वाधिक डॉट बॉल्स टाकण्याचा विक्रम चेन्नई सुपरकिंग्जचा वेगवान गोलंदाज दिपक चहरने आपल्या नावावर केला आहे. मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात दिपकने ही अनोखी कामगिरी केली आहे.


चहरने कोलकाताविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात चार षटके गोलंदाजी करताना तब्बल २० डॉट बॉल्स टाकलेत. आतपर्यंत आयपीएलच्या इतिहासात एका डावात एका गोलंदाजांने टाकलेले हे सर्वाधिक डॉट बॉल्स आहेत.


यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल्स टाकण्याचा विक्रम रशीद खान आणि अंकित राजपूत यांच्या नावावर होता. या दोघांनीही आपल्या आयपीएलच्या एका डावात गोलंदाजी करताना १८-१८ डॉट बॉल्स टाकले होते.


दिपक चहरने या सामन्यात ४ षटके टाकताना २० धावा देत ३ बळी घेतल्या. त्याने कोलकाताचे प्रमुख फलंदाज ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा आणि नितीश राणा यांना माघारी धाडत चेन्नईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details