कराची -पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दानिश कनेरिया या हिंदू क्रिकेटपटूसोबत पाकचे खेळाडू भेदभाव करत होते, असा गौप्यस्फोट केला आहे. त्याने 'गेम ऑन है' या 'टीव्ही' शोमध्ये ही गोष्ट सांगितली. शोएबच्या या वक्तव्याला दानिश कनेरियाने दुजोरा दिला आहे.
होय, माझ्या हिंदू असण्यामुळे पाकचे सहकारी खेळाडू करत होते भेदभाव!
शोएब अख्तरने दानिश कनेरिया या हिंदू क्रिकेटपटूसोबत पाकचे खेळाडू भेदभाव करत होते, असा गौप्यस्फोट केला. शोएबच्या या वक्तव्याला दानिश कनेरियाने दुजोरा दिला आहे.
शोएब अख्तरने जो खुलासा केला तो एकदम खरा आहे. पाकिस्तानच्या संघामध्ये काही खेळाडू होते, ज्यांना माझ्या हिंदू असण्यावर आक्षेप होता. ते माझ्याशी बोलतही नसत. याबाबत उघडपणे बोलण्याचे धाडस मी कधी केले नाही. मात्र, आता मी त्या सर्व खेळाडूंची नावे उघड करेन, असे दानिश कनेरियाने एएनआयला सांगितले.
हेही वाचा - पाकच्या 'पंग्या'वर भारताचा दंगा, बीसीसीआयने घेतला 'हा' निर्णय
दानिश कनेरिया पाकिस्तानच्या संघाकडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू आहे. कनेरियाचे मामा अनिल दलपत हेही पाकिस्तानच्या संघात खेळले होते. दानिश कनेरियाने ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने कसोटीत २६१ तर एकदिवसीयमध्ये १५ बळी घेतले.