नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनी हा तंदुरुस्त असून तो देशासाठी खेळू शकतो, असा विश्वास भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने व्यक्त केला आहे. धोनीच्या भवितव्याचा निर्णय हा धोनीच्या हातात आहे आणि याबद्दल सतत बोलण्याची गरज नाही असेही त्याने म्हटले आहे. मागील वर्षी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धोनीने अखेरच्या मैदानावर पाऊल ठेवले आणि त्यानंतर तो भारतीय संघात दिसला नाही.
''धोनी खूप तंदुरुस्त, त्याने भारताकडून खेळले पाहिजे''
कुलदीप म्हणाला, "मी धोनीला नक्कीच मिस करत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या वरिष्ठ खेळाडूबरोबर खेळता तेव्हा तुम्हाला त्याची कमतरता भासते. निवृत्तीचा प्रश्न धोनीवरच सोडला पाहिजे. या विषयावर वाद घालण्यात अर्थ नाही."

तो पुढे म्हणाला, "धोनी खूप तंदुरुस्त आहे आणि मला वैयक्तिकरित्या वाटते की त्याने भारताकडून खेळले पाहिजे. एक चाहता म्हणून मला नक्की त्याला पाहायचे आहे. जर तो खेळला तर आमच्यासाठी खूप सोपे होईल."
Last Updated : May 9, 2020, 12:33 PM IST