महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार गौतम गंभीर

दिल्लीतील लोकसभेच्या एकूण ७ जागांसाठी निवडणूक होणार असून. १२ मेला मतदान होणार आहे.

By

Published : Apr 23, 2019, 4:45 PM IST

गौतम गंभीर

नवी दिल्ली -भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून भारतीय जनता पक्षाकडून (BJP) लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. गेल्याच महिन्यात गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळीच तो भाजपसाठी लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सोमवारी यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/bjp_2204newsroom_00759_533.JPG


पूर्व दिल्लीत गौतम गंभीरची प्रमुख लढत ही काँग्रेसच्या अरविंदर सिंह आणि आम आदमी पक्षाच्या आतिशीशी होणार आहे. दिल्लीतील लोकसभेच्या एकूण ७ जागांसाठी निवडणूक होणार असून. १२ मेला मतदान होणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने सातही जागांवर विजय मिळवला होता.


गेल्या वर्षी डिंसेबरला गंभीरने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकात गंभीरने भारतासाठी महत्वपूर्ण खेळी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details