महाराष्ट्र

maharashtra

कोरोना व्हायरसचा आयपीएलला दणका?, BCCIकडून मिळाली मोठी अपडेट

By

Published : Mar 9, 2020, 6:02 PM IST

बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले, की 'आयपीएल स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी अद्याप बराच कालावधी आहे. अद्याप आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, देशातील सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आयपीएल व्यवस्थापनाकडून आवश्यक ती पूर्वकाळजी घेतली जात आहे.'

coronavirus threat bcci says still time for ipl no decision has been taken
कोरोना व्हायरसचा आयपीएलला दणका?, BCCI कडून मिळाली मोठी अपडेट

मुंबई - कोरोना व्हायरसमुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहेत. आता तर भारतातील प्रमुख आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्यात येणार का? असा प्रश्न करण्यात आला. यावर बीसीसीआयकडून सूचक उत्तर देण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२० स्पर्धा पुढे ढकलण्यात येऊ शकतो. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

बीसीसीआयच्या सूत्राने सांगितलं, की 'आयपीएल स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी अद्याप बराच कालावधी आहे. अद्याप आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, देशातील सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आयपीएल व्यवस्थापनाकडून आवश्यक ती पूर्वकाळजी घेतली जात आहे.'

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही यासंदर्भात नागपूरमध्ये प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द होताना दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा आजारांचा प्रसार होण्याच्या शक्यता आहे. यामुळे आयपीएल स्पर्धा नंतर घेतली तरी चालू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भातील बोलणी सुरू केली आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच होईल, असे सांगितले.

टोपेंच्या आधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, की 'आयपीएल नियोजित वेळेत होईल. बीसीसीआयकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल.'

कोरोनामुळे जगभरात ४ हजारहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जगभरातील ९०हून अधिक देशात या व्हायरसचा फैलाव झाला आहे. त्यात भारतातमध्ये ४२ रुग्ण कोरोनाचे आढळले आहेत. यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा -६ वर्षाच्या पोरीकडून ब्रेट लीची धुलाई!.. पाहा व्हिडिओ

हेही वाचा -इरफान पठाणच्या मुलाशी सचिनने केली 'बॉक्सिंग', पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details