महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वादग्रस्त ट्विटबदद्दल सीएसकेच्या निलंबित डॉक्टराने मागितली माफी

आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचे डॉक्टर मधु थोटापिल्लिल यांनी ट्विटरवर आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ''मी 16 जून रोजी ट्विट केले होते. माझी टिप्पणी अनुचित आणि अयोग्य असल्याचे समजल्यानंतर मी ते हटवले. पण त्यानंतर माझ्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि शेअर केले गेले.''

Chennai super kings suspended doctor apologizes for tweeting on india china clash
वादग्रस्त ट्विटबदद्दल सीएसकेच्या निलंबित डॉक्टराने मागितली माफी

By

Published : Jun 19, 2020, 3:47 PM IST

नवी दिल्ली -भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक संघर्षावर ट्विट करणाऱ्या आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचे डॉक्टर मधु थोटापिल्लिल यांनी माफी मागितली आहे. त्यांनी केलल्या वादग्रस्त ट्विटबद्दल सीएसकेने त्यांना निलंबित केले होते.

थोटापिल्लिल यांनी ट्विटरवर आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ''मी 16 जून रोजी ट्विट केले होते. माझी टिप्पणी अनुचित आणि अयोग्य असल्याचे समजल्यानंतर मी ते हटवले. पण त्यानंतर माझ्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि शेअर केले गेले.''

ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना महत्त्वहिन म्हणण्याचा माझा हेतू नव्हता. पंतप्रधानांनी किंवा सरकारने सर्व देशवासीयांची काळजी घेण्यासाठी जे काही प्रयत्न केले आहेत, ते कमी करण्याचा माझा मानस नव्हता. आमचे नागरिक शहीद झाले आहेत, आम्ही सर्व सैनिकांचे आभारी आहोत. कोरोनाशी लढण्याच्या या कठीण परिस्थितीत मी सरकारचा आणि सशस्त्र दलाच्या प्रयत्नांचा नेहमीच आदर केला आहे."

थोटापिल्लिल यांनी लिहिले, "माझ्या पोस्टवरून हजारो लोकांच्या भावना दुखावल्या आणि मला तीव्र दु: ख झाले आहे. तसेच माझे ट्विट वाचणाऱ्या लोकांची मी माफी मागू इच्छितो. मी नकळत आणि चुकून हे ट्विट केले."

थोटापिल्लिल यांनी मंगळवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले होते, ज्यात त्यांनी लिहिले, की, "शहीद सैनिकांची शवपेटी पीएम केअर्स फंडाच्या स्टिकर्ससह येतील, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे."

काय घडले भारत-चीन सीमेवर -

चीन सीमेवर-सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अ‌ॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटपट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले.

ABOUT THE AUTHOR

...view details