मुंबई -तब्बल चाळीस वर्षानंतर चंदीगढ संघाला रणजी क्रिकेटमध्ये खेळता येणार आहे. या संघाला बीसीसीआयने मान्यता दिली असल्याचे यूटीसीएचे अध्यक्ष संजय टंडन यांनी सांगितले आहे.
रणजी क्रिकेटमध्ये होणार 'या' नवीन संघाची एन्ट्री, बीसीसीआयने दिली मान्यता
क्रिकेटचा दर्जा प्राप्त असलेल्या राज्यांमध्ये चंदीगढचा समावेश केला आहे.
टंडन म्हणाले, 'बीसीसीआयच्या बैठकीत चंदीगढ क्रिकेटला मान्यता देण्याबाबत म्हटले गेले आहे. मला दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटचा दर्जा प्राप्त असलेल्या राज्यांमध्ये चंदीगढचा समावेश केला गेला आहे. यूटीसीएला १९८२ मध्ये नोंदणीकृत केले गेले होते. बीसीसीआयने याआधी पंजाब आणि हरियाणा यांना एक संस्था करण्यास सांगितले होते.
या प्रकरणावर पंजाबने सहमती दर्शवली होती, मात्र, हरियाणाने नकार कळवला होता. या निर्णयानंतर, चंदीगढच्या खेळाडूंना बीसीसीआयच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता येणार आहे. आधी त्यांना पंजाब आणि हरियाणाकडून खेळावे लागत होते.