'सानिया पाकिस्तानी नागरिक, तिच्याकडील तेलंगणाचे ब्रँड अॅम्बेसिडर पद काढून घ्या'
तेलंगणातील भाजपचे एकमेव आमदार राजा सिंह यांनी सानिया ही पाकिस्तानी असल्याचे म्हटले आहे.
हैदराबाद- जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ल्यानंतर क्रीडा जगतातील अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या यादीत भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाचाही समावेश आहे. मात्र तेलंगणातील भाजपचे एकमेव आमदार राजा सिंह यांनी सानिया ही पाकिस्तानी असल्याचे म्हटले आहे.
सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले असून ती आता पाकची सून आहे. त्यामुळे ती पाकची नागरिक असून तिच्याकडे असलेले तेलंगणाचे ब्रँड अॅम्बेसिडर पद काढून घ्यावे, अशी मागणी तेलंगणातील भाजपचे एकमेव आमदार राजा सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे.
सायनाच्या जागी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला तेलंगण राज्याचे ब्रँड अॅम्बेसिडर करावे, अशी मागणीही राजा सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.