कोलकाता - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने यंदा आयपीएल व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम भारतातच खेळवण्यात यावा, असेही त्याने बोलून दाखवले. आयपीएलची सुरूवात 29 मार्च रोजी होणार होती, पण कोरोनाव्हायरसमुळे या लीगला अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
यंदाचे वर्ष आयपीएलशिवाय संपू नये - गांगुली
गांगुलीने एका वृत्तवाहिनीला सांगितले, ''आम्हाला आयपीएलचे आयोजन करायचे आहे. कारण जीवनाला आणि क्रिकेटला सामान्य पातळीवर आणणे गरजेचे आहे. परंतु टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसंदर्भात आम्हाला आयसीसीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही."
गांगुलीने एका वृत्तवाहिनीला सांगितले, ''आम्हाला आयपीएलचे आयोजन करायचे आहे. कारण जीवनाला आणि क्रिकेटला सामान्य पातळीवर आणणे गरजेचे आहे. परंतु टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसंदर्भात आम्हाला आयसीसीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आम्ही माध्यमांद्वारे बर्याच गोष्टी ऐकत राहतो, परंतु अद्याप तसे अधिकृतपणे मंडळाच्या सदस्यांना कळवले गेले नाही. आम्हाला भारतात आयपीएलचे आयोजन करायचे आहे. ही आमची प्राथमिकता आहे. जर आम्हाला 35-40 दिवस मिळाले, तरीही आम्ही आयपीएलचे आयोजन करू. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई हे आयपीएलचे मोठे संघ आहेत. परंतू या शहरात आयपीएलचे आयोजन होऊ शकत नाही."
तो पुढे म्हणाला, "अहमदाबादमधील नवीन स्टेडियममध्ये जाण्यास आम्ही उत्सुक आहोत. परंतू याबाबत आम्ही अजूनही विचार करत आहोत. आयपीएल बाहेर नेण्यासंबंधी सांगायचे झाले तर, बोर्ड आणि फ्रेंचायझींसाठी हे खर्चिक ठरेल. म्हणून आम्ही गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही आयपीएलचे आयोजन करण्यास तयार आहोत. हे वर्ष आयपीएलशिवाय संपू नये, अशी आम्हाला आशा आहे."