नवी दिल्ली - राहुल जोहरी यांनी राजीनामा दिल्यानंतर हेमंग अमीन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी मंडळाच्या कर्मचार्यांना ही माहिती देण्यात आली.
हेमंग अमीन यांची बीसीसीआयच्या हंगामी सीईओपदी निवड
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ''अमीन हे या पदासाठी योग्य व्यक्ती आहेत आणि बीसीसीआयमध्ये जोहरी यांच्यापेक्षा त्यांचे योगदान जास्त आहे." गुरुवारी जोहरी यांचा राजीनामा मंजूर झाला.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ''अमीन हे या पदासाठी योग्य व्यक्ती आहेत आणि बीसीसीआयमध्ये जोहरी यांच्यापेक्षा त्यांचे योगदान जास्त आहे." गुरुवारी जोहरी यांचा राजीनामा मंजूर झाला. या प्रकरणी माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गोपनीय आर्थिक माहिती नीट न ठेऊ शकल्यामुळे जोहरी यांच्यावर ही वेळ आली आहे.
यापूर्वी, अमीन आयपीएलचे सीओओ (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) होते. गेल्या वर्षी पुलवामा शहfदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका होती.