मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला खेळाडूंचे वार्षिक मानधन करार जाहीर करण्यात आले आहेत. या वार्षिक करारात एकूण २० महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अ, ब, आणि क अशा गटात खेळाडूंना विभागण्यात आले आहे.
महिला खेळाडूंचे वार्षिक मानधन करार बीसीसीआयकडून जाहीर
वार्षिक करारात एकूण २० महिला खेळाडूंचा समावेश
महिला खेळाडूंच्या अ गटातील खेळाडूंना ५० लाख , ब गटासाठी ३० लाख तर क गटातील १० लाखांचे मानधन बीसीसीआय देणार आहे. अ गटात ४ महिला खेळाडूंचा सामावेश करण्यात आला आहे. तर ब गटात ५ आणि क गटात ११ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
अ श्रेणी महिला खेळाडू (५० लाख )
मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधाना आणि पूनम यादव
ब श्रेणी महिला खेळाडू (३० लाख )
एकता बिष्त, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, दिप्ती शर्मा आणि जेमिमा रोड्रिगेज
क श्रेणी महिला खेळाडू (१० लाख )
राधा यादव, डी हेमलता, अनुजा पाटिल, वेदा कृष्णमूर्ती, मानसी जोशी, पूनम राउत, मोना मेश्राम, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर आणि तानिया भाटिया.