मुंबई - महेंद्रसिंह धोनी आणि अब्राहम डिव्हिलियर्स या दोन फलंदाजांबरोबर फलंदाजी करायला आवडते, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिले आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनशी इन्स्टाग्राम लाइव्हवर झालेल्या संभाषणावेळी कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली. कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतात.
धोनी आणि डिव्हिलियर्ससोबत फलंदाजी करायला आवडते - विराट
कोहली म्हणाला, "मला मैदानात चपळाईने धावा घेणाऱ्या फलंदाजांसोबत फलंदाजी करायला आवडते. त्यामुळे भारतीय संघाचं बोलायचं झालं तर धोनी आणि आयपीएलमधील बंगळुरू संघाचं बोलायचं झालं तर डिव्हिलियर्स. जेव्हा आम्ही एकत्र फलंदाजी करतो तेव्हा आम्ही बोलणे टाळतो.”

कोहलीनेही भारतीय संघाला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक संघ, असे म्हटले आहे. या बदलाचा केंद्रबिंदू होणं हे माझ्यासाठी नशिबाची गोष्ट होती. आमच्यात काय अभाव आहे आणि जग काय करत आहे हे मी पाहिले. त्यामुळे या खेळाडूंसोबत मला खेळण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य होते, असेही कोहलीने या संभाषणादरम्यान सांगितले.