ढाका -ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या कसोटीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या मुलीच्या जन्मासाठी मायदेशी परतला होता. त्यानंतर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सननेही पितृत्वाची रजा घेतली होती. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या पितृत्वाच्या रजेला मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी न्यूझीलंड दौर्यासाठी शाकिब संघात सामील होणार नाही.
शाकिब अल हसन आणि त्याची पत्नी हेही वाचा - आयसीसीकडून निसर्ग पटेलला हिरवा कंदील, पुन्हा करू शकणार गोलंदाजी
एका वृत्तानुसार, शाकिबने आपल्या तिसर्या मुलाच्या जन्मासाठी बीसीबीकडून पितृत्व रजेची विनंती केली होती. शिवाय, त्याने पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या षटकांच्या मालिकेसाठी संघात समावेश न करण्याबाबत सांगितले होते. त्याची विनंती बीसीबीने मान्य केली आहे. शाकिब दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. चितगाव येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसर्या दिवशी शाकिबच्या डाव्या मांडीला दुखापत झाली होती.
शाकिबवर होती बंदी -
बांलगादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसनवर आयसीसीने भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन वर्षाची बंदी घातली होती. त्याचे निलंबन २९ ऑक्टोबर २०२० रोजी संपुष्टात आले. शाकिबला बुकींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याने ही बाब आयसीसीला कळवली नाही. यामुळे नियमांचा भंग केल्याप्रकरणी शाकिबवर ही बंदी घालण्यात आली होती.