महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूची दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया

एका वृत्तंस्थेच्या वृत्तानुसार, 23 वर्षीय रिचर्ड्सनची गेल्या महिन्यात उजव्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मागच्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे रिचर्ड्सनला सहा महिने क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले गेले होते. या दुखापतीमुळे त्याला विश्वकरंडक आणि अ‌ॅशेस मालिकेला मुकावे लागले होते.

By

Published : May 8, 2020, 7:35 AM IST

Australian fast bowler jhye richardson underwent shoulder surgery
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूची दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया

मेलबर्न -ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला दुसऱ्यांदा खांद्याच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. कोरोनामुळे क्रिकेटचे स्वरूप थंडावले असल्याने या शस्त्रक्रियेनंतर रिचर्डसनला सावरण्यासाठी योग्य कालावधी मिळेल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

एका वृत्तंस्थेच्या वृत्तानुसार, 23 वर्षीय रिचर्ड्सनची गेल्या महिन्यात उजव्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मागच्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे रिचर्ड्सनला सहा महिने क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले गेले होते. या दुखापतीमुळे त्याला विश्वकरंडक आणि अ‌ॅशेस मालिकेला मुकावे लागले होते.

न्यूज कॉर्पचे सीएचे क्रीडा विज्ञान प्रमुख एल्केस कॉटोरिस म्हणाले, “जेव्हा तुमच्या खांद्याचे हाड जागेवरुन बाहेर पडते तेव्हा अस्थिबंधन सोडले जाते आणि नंतर शस्त्रक्रियेद्वारे ते नीट होते. यापूर्वीही इतर बर्‍याच खेळाडूंसह असे घडले आहे. आम्ही आशा करतो की आम्ही ही समस्या दूर करू."

ABOUT THE AUTHOR

...view details