महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

२० वर्षात फक्त २ शतके झळकावलेल्या क्रिकेटपटूची निवृत्ती

व्हिक्टोरियाच्या व्हाइटने ऑस्ट्रेलियाकडून ४ कसोटी, ९१ एकदिवसीय आणि ४७ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे १४६, २०७२ आणि ९८४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २ शतके आणि ११ अर्धशतके केली आहेत. तर, टी-२० मध्ये त्याच्या नावावर ५ अर्धशतके जमा आहेत. व्हाईटने ४७ आयपीएलचे सामने खेळले असून त्यात त्याने ६ अर्धशतकांसह ९५४ धावा केल्या आहेत. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे सात वेळा नेतृत्व केले आहे. आता तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे.

By

Published : Aug 22, 2020, 11:47 AM IST

Australian cricketer Cameron White retired from all forms of cricket.
२० वर्षात फक्त २ शतके झळकावलेल्या क्रिकेटपटूची निवृत्ती

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरून व्हाईटने २० वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीला रामराम ठोकला आहे. ''मी खेळामधून निवृत्त झालो. हे निश्चित आहे'', असे व्हाईटने सांगितले.

व्हिक्टोरियाच्या व्हाइटने ऑस्ट्रेलियाकडून ४ कसोटी, ९१ एकदिवसीय आणि ४७ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे १४६, २०७२ आणि ९८४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २ शतके आणि ११ अर्धशतके केली आहेत. तर, टी-२० मध्ये त्याच्या नावावर ५ अर्धशतके जमा आहेत. व्हाईटने ४७ आयपीएलचे सामने खेळले असून त्यात त्याने ६ अर्धशतकांसह ९५४ धावा केल्या आहेत. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे सात वेळा नेतृत्व केले आहे. आता तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे.

कॅमेरून व्हाईट

"माझा स्ट्रायकर्सबरोबर एक वर्षाचा करार होता. गेल्या वर्षी मी त्यांच्याबरोबर थोडेसे क्रिकेट खेळलो. आणखी एक संधी मिळवण्यासाठी मला खरोखरच खेळायला पाहिजे होते. खरे सांगायचे तर मला वाटते माझी वेळ नक्कीच संपली आहे. माझ्याकडे खेळाच्या दृष्टिकोनातून पुरेसे आहे आणि मी प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास तयार आहे", असे व्हाईटने निवृत्तीनंतर सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details