लंडन - अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २६७ धावांचे आव्हान होते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा संघ ४७.३ षटकात ६ गडी बाद १५४ धावा केल्या. यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. या डावात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनचा जो डेनली याने हवेत सूर मारुन भन्नाट झेल घेतला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
VIDEO : अॅशेस - जो डेनली 'सुपरमॅन', ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा टिपला अप्रतिम झेल
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाची अवस्था ४७ धावांवर ३ गडी बाद अशी होती. तेव्हा सामन्यात आर्चरचा चेंडू लागून रिटायर्ड हर्ट झालेल्या स्टिव स्मिथच्या ठिकाणी संघात सहभागी झालेला मार्नस लाबुशेन याने अर्धशतक झळकावले. तो बाद झाल्यानंतर ट्रेविस हेड आणि कर्णधार पेन फलंदाजी करत होते. तेव्हा आर्चरच्या एका उचळत्या चेंडूवर पेन फटका मारण्याच्या नादात उडालेला झेल डेनलीने हवेत सूर मारत घेतला.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाची अवस्था ४७ धावांवर ३ गडी बाद अशी होती. तेव्हा सामन्यात आर्चरचा चेंडू लागून रिटायर्ड हर्ट झालेल्या स्टिव स्मिथच्या ठिकाणी संघात सहभागी झालेला मार्नस लाबुशेन याने अर्धशतक झळकावले. तो बाद झाल्यानंतर ट्रेविस हेड आणि कर्णधार पेन फलंदाजी करत होते. तेव्हा आर्चरच्या एका उचळत्या चेंडूवर पेन फटका मारण्याच्या नादात उडालेला झेल डेनलीने हवेत सूर मारत घेतला. यामुळे ऑस्ट्रेलियाला पेनच्या रुपाने १४९ धावांवर सहावा धक्का बसला.
डेनली याने आपल्या डाव्या बाजूकडे सूर मारत अविश्वसीन असा झेल घेतला. हा झेल पाहून प्रेक्षकांनी टाळ्या बाजवून डेनलीच्या कामगिरीची दाद दिली.