मुंबई - भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित अगरकरसह मुंबई क्रिकेट निवड समितीच्या ४ सदस्यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अॅड-हॉक समितीची बैठक पार पडल्यानंतर निवड समितीच्या या सदस्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
अजित अगरकरसह मुंबई क्रिकेट निवड समितीच्या सदस्यांचा राजीनामा
निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर, निलेश कुलकर्णी, सुनील मोरे आणि रवि ठक्कर यांनी त्यांचे राजीनामे अॅड-हॉक समिती आणि एमसीएचे प्रमुख कार्यकारी सी. एस. नाईक यांच्याकडे दिले आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर, निलेश कुलकर्णी, सुनील मोरे आणि रवि ठक्कर यांनी त्यांचे राजीनामे अॅड-हॉक समिती आणि एमसीएचे प्रमुख कार्यकारी सी. एस. नाईक यांच्याकडे दिले आहे.
निवडी समितीचे सदस्य स्थानिक सामने पाहण्यासाठी जात नसल्याचा आरोप लावण्यात आला होता. मागील महिन्यात विशेष सर्वसाधारण सभा झाली होती. त्यात निवड समिती बर्खास्त करण्याची मागणी करण्यात आली होती.
मागील दोन सीझनमध्ये मुंबईच्या संघाने केवळ एकच चषक जिंकला होता. १२ वर्षानंतर या वर्षी मुंबईने विजय हजारे ट्रॉफीचा किताब जिंकला होता. मुंबई क्रिकेटच्या भवितव्याचा विचार करून अगरकर आणि त्यांच्या सहकारी अनेक कटू निर्णय घेतले आहे. त्यांनी त्यात त्या खेळाडूंना बाहेर काढले जे खेळाडूं मैदानावर सतत यशासाठी संघर्ष करताना दिसून आले.