महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO : उडवला त्रिफाळा, नंतर भरमैदानात अजब स्टंट करत केलं सेलिब्रेशन

बिग बॅश लीगमध्ये हॉबर्ट हरिकेंस आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात टी-२० सामना खेळवण्यात येत होता. या सामन्यात अफगाणिस्तानचा १९ वर्षीय फिरकीपटू कॅस अहमदने एक हटके सेलिब्रेशन केले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

By

Published : Dec 21, 2019, 2:58 PM IST

Afghan Spinner Celebrating After Taking A Wicket In BBL, Watch VIDEO
VIDEO : उडवला त्रिफाळा, नंतर भरमैदानात अजब स्टंट करत केलं सेलिब्रेशन

मेलबर्न- क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूची एक सेलिब्रेशनची वेगळी स्टाईल असते. जसं की, विंडीजच्या शेल्डन कॉट्रेलचे 'सॅल्युट' असो की तबरेज शम्सीचा बुट काढून कॉल करायचं सेलिब्रेशन. मात्र, बिग बॅश लीगमध्ये एक खेळाडू भलत्याच प्रकारे सेलिब्रेशन करताना दिसून आला.

बिग बॅश लिगमध्ये हॉबर्ट हरिकेंस आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात टी-२० सामना खेळवण्यात येत होता. या सामन्यात अफगाणिस्तानचा १९ वर्षीय फिरकीपटू कॅस अहमदने एक हटके सेलिब्रेशन केले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॅस अहमदने दहाव्या षटकात इंग्लंडचा फलंदाज टॉम करेनला लेगस्पिनवर बाद केले. टॉम करन बाद होताच कॅस अहमदने थोड्या अंतरावर धाव घेतली आणि नंतर उडी मारुन चमत्कारिक पद्धतीने आनंद साजरा केला.

दरम्यान, या सामन्यात कॅस अहमदने चार गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने ४ षटकात ३ च्या इकॉनॉमी रेटने केवळ १२ धावा देत ४ गडी बाद केले. या सामन्यात हॉबर्ट हरिकेसने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून १२९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल सिडनी सिक्सर्सचा संघ १८.४ षटकात १०४ धावांवर आटोपला.

हेही वाचा -कटक वनडेपूर्वी कोहली कंपनीने घेतला ब्रेक, पाहा काय करताहेत तुमचे आवडते खेळाडू?

हेही वाचा -३७ चेंडूत शतक ठोकणाऱ्या युसूफला IPLमध्ये कुणीही वाली नाही... इरफाननं केलं भावूक ट्विट

ABOUT THE AUTHOR

...view details