कराची -पदार्पणाच्या कसोटी सामन्यात आणि त्याच्या पुढच्या सामन्यातही शतक ठोकल्यानंतर पाकिस्तानी फलंदाज आबिद अलीने एक खास विक्रम नोंदवला. पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग शतक ठोकणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला पाकिस्तानी खेळाडू आणि नववा फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा -VIDEO : तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाने मैदानात गाळला घाम
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आबिदने हा कारनामा केला. या सामन्यात आबिदने २१ चौकार आणि एका षटकारासह १७४ धावांची खेळी केली. आबिद आणि शान यांनी पहिल्या विकेटसाठी २७८ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी केलेली ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. याआधी १९९७ मध्ये आमीर सोहेल आणि इजाझ अहमद यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी केली होती.