नवी दिल्ली -क्रिकेटच्या सामन्यादरम्यान ओडिशा येथील १८ वर्षीय तरूण क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सत्यजीत प्रधान असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. केंद्रापाडाजवळील देराविश महाविद्यालयात सत्यजीत इयत्ता बारावीमध्ये शिकत होता.
१८ वर्षीय क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू! - ओडिशा क्रिकेटपटूचा मृत्यू न्यूज
सत्यजीत प्रधान असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. महाविद्यालयीन मैदानावर स्थानिक सामन्यावेळी सत्यजीत बेशुद्ध पडला.

१८ वर्षीय क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
हेही वाचा -लालरेमसियामीला मिळाला 'उदयोन्मुख महिला हॉकीपटू’ पुरस्कार
एक वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, महाविद्यालयीन मैदानावर स्थानिक सामन्यावेळी सत्यजीत बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.