मुंबई- ऑलिंपिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चायनिझ कंपनी ली निंगसोबत ५० कोटींचा मोठा करार केला आहे. शुक्रवारी सिंधूने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ली निंगसोबत करार करून आनंदी आहे, असे सिंधूने करारानंतर म्हटले आहे.
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा चायनिझ कंपनीशी ५० कोटींचा करार
विराट कोहलीचा पुमासोबत झालेल्या १०० कोटींसारखाच हा सगळ्यात मोठ्या करारांपैकी एक करार आहे. यात प्रायोजकासाठी सिंधूला ४० कोटी मिळतील तर, १० कोटी सिंधूला इतर बाबींसाठी मिळणार आहेत.
सिंधूसोबत करार करुन आम्ही आनंदी आहोत. हा ४ वर्षाचा करार जवळपास ५० कोटींचा आहे. विराट कोहलीचा पुमासोबत झालेल्या १०० कोटींसारखाच हा सगळ्यात मोठ्या करारांपैकी एक करार आहे. यात प्रायोजकासाठी सिंधूला ४० कोटी मिळतील तर, १० कोटी सिंधूला इतर बाबींसाठी मिळणार आहेत. असा मिळून हा करार एकूण ५० कोटींचा असणार आहे, असे ली निंग इंडियाची सहयोगी कंपनी सनलाईट स्पोर्टसच्यावतीने महेंद्र कपूर यांनी सांगितले.
वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. २०१६ साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले होते. कपूर म्हणाले आम्ही पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांच्यासोबत दीर्घकालीन करार करण्यासाठी उत्सुक आहोत. सिंधूच्या आधी जानेवारी महिन्यात ली निंग कंपनीने किदम्बी श्रीकांतसोबत ३५ कोटींचा करार केला आहे.