महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंडोनेशियाचा 'मातब्बर' प्रशिक्षक सिंधूला देणार प्रशिक्षण

विशेष म्हणजे गोपीचंद स्वत: सांतोसो यांचा पाठपुरावा करत होते. सांतोसो हे माजी विश्वविजेता, सिडनी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता आणि बँकॉक आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या इंडोनेशियाच्या हेंद्रावन आणि ऑल इंग्लंडचे अंतिम विजेत्या बुदी सांतोसोचे प्रशिक्षक राहिले आहे.

By

Published : Feb 26, 2020, 4:09 PM IST

Indonesian coach is coming to train PV Sindhu
इंडोनेशियाचा 'मातब्बर' प्रशिक्षक सिंधूला देणार प्रशिक्षण

नवी दिल्ली- काही महिन्यांपूर्वी, सिंधूची माजी प्रशिक्षक किम जी ह्यून यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आता सिंधूला प्रशिक्षण देण्यासाठी इंडोनेशियाच्या व्यक्तीची वर्णी लागणार आहे. इंडोनेशियन प्रशिक्षक आगुस ड्वी सांतोसो ऑलिम्पिकपूर्वी सिंधूची तयारी करून घेणार आहेत. सिंधू, सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत यांच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सांतोसो भारतात येणार आहेत.

इंडोनेशियन प्रशिक्षक आगुस ड्वी सांतोसो

हेही वाचा -अखेर ठरलं!...धोनी 'या' दिवशी मैदानात उतरणार

विशेष म्हणजे गोपीचंद स्वत: सांतोसो यांचा पाठपुरावा करत होते. सांतोसो हे माजी विश्वविजेता, सिडनी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता आणि बँकॉक आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या इंडोनेशियाच्या हेंद्रावन आणि ऑल इंग्लंडचे अंतिम विजेत्या बुदी सांतोसोचे प्रशिक्षक राहिले आहे.

गतवर्षीच्या सुरुवातीला सांतोसो थायलंडमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सलग तीन वेळा सायनाला पराभूत करणाऱ्या बुसाननला प्रशिक्षण दिले होते. गतवर्षीसुद्धा सांतोसो भारतात दाखल होणार होते, परंतु ते थायलंडला गेले.

माजी प्रशिक्षक किम जी ह्यूनचा सिंधूवर आरोप -

भारतीय महिला बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूची माजी प्रशिक्षक किम जी ह्यून यांनी सिंधु असंवेदनशील असल्याचे म्हटले होते. ह्यून यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधुने विजेतेपद जिंकून इतिहास रचला. त्यानंतर, ह्युन यांनी आपल्या आजारी पतीची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

'ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधू अत्यंत असंवेदनशील व्यक्ती आहे. कारण जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी बासेल गाठल्यानंतर मी आजारी पडली होती. तेव्हा ती मला भेटायलाही आली नाही किंवा माझी प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही', असे ह्युनने कोरियन यु ट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details