महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

थायलंड ओपन : पारुपल्ली कश्यपने अर्धवट सोडला सामना

जेसनने पहिल्या सेटमध्ये कश्यपला २१-९ असे हरवले. तर, दुसऱ्या सेटमध्ये कश्यपने २१-१३ असे पुनरागमन केले. तिसऱ्या सेटमध्ये स्नायू ताणले गेल्यामुळे कश्यपला माघार घ्यावी लागली. दुसरीकडे, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने कोरियाच्या किम जि जुंग आणि ली योंग डाएला १९-२१, २१-१६, २१-१४ अशी मात देत दुसरी फेरी गाठली.

indian shuttler kashyap went from the middle of the first round of thailand open
थायलंड ओपन : पारुपल्ली कश्यपने अर्धवट सोडला सामना

By

Published : Jan 13, 2021, 4:16 PM IST

बँकॉक -भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप थायलंड ओपन सुपर १००० स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडला आहे. तंदुरुस्तीच्या कारणामुळे कश्यपने पहिला सामना अर्ध्यातच सोडला. कॅनडाच्या जेसन अथनीसोबत तो तिसऱ्या सेटमध्ये ८-१५ असा मागे होता.

हेही वाचा -IND VS AUS : विल पुकोवस्कीला दुखापत; प्रशिक्षक लँगरने दिले 'हे' संकेत

जेसनने पहिल्या सेटमध्ये कश्यपला २१-९ असे हरवले. तर, दुसऱ्या सेटमध्ये कश्यपने २१-१३ असे पुनरागमन केले. तिसऱ्या सेटमध्ये स्नायू ताणले गेल्यामुळे कश्यपला माघार घ्यावी लागली. दुसरीकडे, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने कोरियाच्या किम जि जुंग आणि ली योंग डाएला १९-२१, २१-१६, २१-१४ अशी मात देत दुसरी फेरी गाठली.

सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी

तर, मलेशियाच्या ओंग यू सिन आणि टिओयो यी यांनी अर्जुन एम रामचंद्रन आणि ध्रुव कपिला यांचा १३-२१, २१-८, २४-२२ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि सुमित रेड्डी बी यांनाही पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

ABOUT THE AUTHOR

...view details