महाराष्ट्र

maharashtra

Hong Kong Open : सात्विक-चिराग जोडी फॉर्मात, सिंधू सायनाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

By

Published : Nov 12, 2019, 8:37 AM IST

आज (मंगळवार) पासून सुरू होत असलेल्या हाँगकाँग ओपन स्पर्धेमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंचा सर्वोत्तम कामगिरीवर भर असणार आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरीची जोडी आपली शानदार कामगिरी करतच आहे. पण चाहत्यांची नजर पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्या कामगिरीवर आहे.

Hong Kong Open : सात्विक-चिराग जोडी फॉर्मात, सिंधू सायनाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

हाँगकाँग- आज (मंगळवार) पासून सुरू होत असलेल्या हाँगकाँग ओपन स्पर्धेमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंचा सर्वोत्तम कामगिरीवर भर असणार आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरीची जोडी आपली शानदार कामगिरी करतच आहे. पण चाहत्यांची नजर पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्या कामगिरीवर आहे. दोघीनांही मागील काही स्पर्धामध्ये अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यामुळे या स्पर्धेत चांगली कामगिरीसह विजेतेपद पटकावतील अशी आशा व्यक्त होत आहे.

भारतीय चिराग- सात्विक जोडीने आपला फॉर्माचा आलेख चढता ठेवला आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेली भारतीय जोडी फ्रेंच ओपनमध्ये उपविजेता ठरली होती. तर गेल्या आठवड्यात त्यांनी चीन ओपनमध्ये उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. यामुळेया स्पर्धेत सात्विक व चिराग जोडीकडून पुन्हा एकदा चमकदार कामगिरीची आशा आहे.

पुरुष गटात किदाम्बी श्रीकांत याच्यावर भारताची मदार आहे. मात्र, त्याचा सामना पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या केंटो मोमोटाचे यांच्याशी होणार आहे. यामुळे त्याचे आव्हान खडतर बनले आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी मिश्र दुहेरी गटात अश्विनी पोनप्पासोबत खेळणार आहे. अश्विन व एन. सिक्की रेड्डी महिला दुहेरीमध्ये तर प्रणव जेरी चोपडा व सिक्की मिश्र दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

हेही वाचा -फ्रेंच ओपन २०१९ : स्वप्न भंगलं, अंतिम सामन्यात सात्विक-चिराग जोडीचा पराभव

हेही वाचा -भारताच्या सात्विकसाईराज अन् चिरागची फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात धडक

ABOUT THE AUTHOR

...view details