मुंबई- राज्य सरकारतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या २०१७-१८ या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी मुंबईचे उदय विश्वनाथ देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर, २०१३ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केलेल्या साताऱ्याच्या प्रियंका मंगेश मोहिते हिची साहसी पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडेंनी पत्रकार परीषदेत दिली.
हा पुरस्कार वितरण सोहळा गेट वे ऑफ इंडिया येथे होणार आहे. राज्य सरकारतर्फे २०१७-१८ मध्ये एकूण ८८ खेळाडूंना पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. १७ फेब्रुवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते या ८८ पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात येईल.
पुरस्कार विजेत्यांची संपुर्ण यादी
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार
उदय विश्वनाथ देशपांडे, मुंबई शहर
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकव जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार
सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार
अमेय शामसुंदर जोशी, औरंगाबाद,(जिम्नॅस्टिक्स) (थेट पुरस्कार)
सागर श्रीनिवास कुलकर्णी, औरंगाबाद,(जिम्नॅस्टिक्स) (थेट पुरस्कार)
गजानन मारुती पाटील, पुणे (अॅथलेटिक्स)
मृणालीनी वैभव औरंगाबादकर, पुणे, (बुध्दीबळ) (थेटपुरस्कार)जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (उत्कृष्ठ मार्गदर्शक)
संजय बबन माने, मुंबई (कुस्ती) (थेट पुरस्कार)
भूषण पोपटराव जाधव, ठाणे, (तलवारबाजी) (थेट पुरस्कार)
उमेश रमेशराव कुलकर्णी, पुणे, (तायक्वोंदो) ) (थेट पुरस्कार)
बाळकृष्ण मलप्पा भंडारी, पुणे, (तायक्वोंदो) (थेट पुरस्कार)
स्वप्नील सुनिल धोपाडे, अमरावती, (बुध्दीबळ), (थेट पुरस्कार)
निखिल सुभाष कानेटकर, पुणे, (बॅडमिंटन), (थेट पुरस्कार)
सत्यप्रकाश माताशरन तिवारी, मुंबई उपनगर, (बॅडमिंटन), (थेट पुरस्कार)
दिपाली महेंद्र पाटील, पुणे (सायकलिंग)
जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (उत्कृष्ठ मार्गदर्शक)
सांघिक क्रीडा प्रकार
पोपट महादेव पाटील, सांगली, (कबडडी) (थेट पुरस्कार)
राजेंद्र प्रल्हाद शेळके़ सातारा, (रोईंग) (थेट पुरस्कार)
लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे, अमरावती, (वॉटरपोलो)
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) (सन 2017-18), आर्चरी
प्रविण रमेश जाधव, सातारा
भाग्यश्री नामदेव कोलते, पुणे
अॅथलेटिक्स
सिध्दांत उमानंद थिंगालाया, मुंबई उपनगर (थेट पुरस्कार)
मोनिका मोतीराम आथरे, नाशिक (थेट पुरस्कार)
कालिदास लक्ष्मण हिरवे, सातारा
मनिषा दत्तात्रय साळुंखे़, सांगली
ट्रायथलॉन
अक्षय विजय कदम, सांगली –
वुशु
शुभम बाजीराव जाधव,कोल्हापूर
श्रावणी सोपान कटके,पुणे
स्केटींग
सौरभ सुशिल भावे, पुणे –
हॅण्डबॉल
महेश विजय उगीले, लातूर
समीक्षा दामोदर इटनकर, नागपूर
जलतरण
श्वेजल शैलेश मानकर,पुणे
युगा सुनिल बिरनाळे,पुणे
कॅरम
पंकज अशोक पवार,ठाणे
मैत्रेयी दत्तात्रय गोगटे,रत्नागिरी
जिम्नॅस्टिक्स
सागर दशरथ सावंत, मुंबई उपनगर (आर्टिस्टक )
दिशा धनंजय निद्रे – मुंबई शहर (रिदॅमिक)
टेबल टेनिस
सनिल शंकर शेट्टी- मुंबई उपनगर (थेट पुरस्कार) –
तलवारबाजी
अक्षय मधुकर देशमुख, नाशिक
रोशनी अशोक मुर्तडक ,नाशिक
बॅडमिंटन
अक्षय प्रभाकर राऊत ,बीड
नेहा पंडीत ,पुणे
बॉक्सिंग
भाग्यश्री शिवकुमार पुरोहित, मुंबई
रोईग
राजेंद्रचंद्र बहादुर सोनार,नाशिक
पुजा अभिमान जाधव, नाशिक