महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

झी मराठी आणि निर्मात्यांकडून सर्व कलाकार व युनिटची सोय सर्वोत्तम हॉटेलमध्ये, एकाच ठिकाणी!

बायोबबल पद्धतीने मालिकांचं शूटिंग सुरू आहे. झी मराठीवरील मालिकांचे चित्रिकरण बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूरमध्ये सुरू आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांची सोय एकाच ठिकाणी सर्वोत्तम हॉटेल, रिसॉर्ट मध्ये केल्यामुळे सर्वात किमती असलेल्या वेळेची बचत तर होतेच परंतु संपूर्ण युनिटमधील सलोखा वाढतो.

Zee Marathi
कलाकार आणि युनिट थांबलेले होटेल..

By

Published : Apr 25, 2021, 9:07 AM IST

मुंबई- सध्या लॉकडाऊन सुरू असून बरेच निर्माते महाराष्ट्राबाहेर आपापल्या मालिकांचे शुटिंग्स करताहेत. नेहमी कलाकारांना स्पेशल ट्रीटमेंट मिळत असते. परंतु झी मराठी आणि त्यांच्या मालिकांचे निर्माते यांनी एक गोष्ट प्रामुख्याने केलीय ती म्हणजे सर्व कलाकार व युनिटची सोय एकाच ठिकाणी सर्वोत्तम हॉटेल, रिसॉर्ट मध्ये केली आहे. यातून समानतेचा संदेश देत शूटिंगमध्ये प्रत्येक जण महत्वाचा असतो हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे.

बायोबबल पद्धतीने मालिकांचं शूटिंग सुरू आहे. झी मराठीवरील मालिकांचे चित्रिकरण बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूरमध्ये सुरू आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व कलाकार आणि तंत्रज्ञाची सोय एकाच ठिकाणी सर्वोत्तम हॉटेल/रिसॉर्ट मध्ये केल्यामुळे सर्वात किमती असलेल्या वेळेची बचत तर होतेच परंतु संपूर्ण युनिटमधील सलोखा वाढतो. झी मराठीच्या प्रवक्त्याने सांगितले की हा प्रवास आम्ही करतोय तो फक्त प्रेक्षकांचा मनोरंजनाचा प्रवास खंडित न होता आणि अधिकाधिक मनोरंजक व्हावा म्हणून.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मराठी मालिकादेखील महाराष्ट्राची वेस ओलांडून परराज्यात चित्रीकरण करताहेत. झी मराठीवरील सर्व मालिकांचे कलाकार आणि तंत्रज्ञ मग ते स्पॉट दादा असू दे किंवा मुख्य कलाकार कुठेही भेदभाव न करता या सर्वांची राहण्याची सोय त्या त्या शहरातील सर्वोत्तम हॉटेल, रिसॉर्ट मध्ये करण्यात आलीय. अजून एक विशेष बाब म्हणजे सर्व तंत्रज्ञ हे सुरवातीपासून मालिकेशी जोडले गेलेत म्हणजेच सर्व तंत्रज्ञ हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत. मालिकांचं संकलन देखील त्याच ठिकाणी होतंय.

झी मराठीच्या परंपरेनुसार ओरिजिनल मनोरंजनात खंड पडू न देता प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिकांमध्ये पाहू शकणार आहेत खालील गोष्टी -

‘पाहिले ना मी तुला’ मध्ये मनू आणि अनिकेत च्या लग्नाचं सत्य विक्षिप्त समर आणि मनूच्या घरच्यांसमोर..

‘येऊ कशी तशी मी नांदायला' मध्ये ओम आणि स्वीटू च्या प्रेमाचाप्रवास लग्नापर्यंत जाईल? की मालविका आणि मोहित काही नवीन आव्हानं उभी करतील?..

‘अग्गबाई सुनबाई’ मध्ये सोहम चं खरं रूप आसावरी समोर येईल का..

‘माझा होशील ना’ मध्ये कसं सामोरं जाईल ब्रह्मे कुटुंब आणि सई आदित्य, समोर आलेल्या संकट आणि आव्हानांना?..

‘देवमाणूस’ मधून दिव्या डॉ. अजित चं खरं रूप जगासमोर आणेल?..

‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये अभिराम वाडा विकायला तयार होईल? सरिता वाडा विकण्याचा विचार करत असताना दत्ता का जाईल विरोधात? की माई च्या म्हणण्यानुसार हा वाडा कधीच विकला जाणार नाही? काय आहे कावेरी आणि सयाजी ला दिसणाऱ्या गूढ सावल्यां मागील रहस्य?..

कोरोना संकट संपल्यावरही मुंबईतसुद्धा हीच परंपरा सुरू राहील अशी अपेक्षा मालिकेचे तंत्रज्ञ आणि संपूर्ण युनिट करीत असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details