एर्नाकुलम - भारताच्या लक्षद्वीप बेटावर राहणारी अभिनेत्री आयशा सुल्तानावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. बेटावर कोविड रुग्ण संख्येमध्ये अचानक वाढ झाल्याबद्दल तिने एका चर्चेच्या वेळी स्थानिक प्रशासनाला 'बायो-वेपन' ('जैविक अस्त्र') म्हटले होते.
टीव्ही शोमधील चर्चेच्या वेळी आयशाने हे विधान केले होते. अलिकडेच लक्षद्वीप बेट समुह प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांच्या प्रशासनातील बदलांच्या पार्श्वभूमीवर हे विधान तिने केले होते. याबाबत स्थानिक भाजपा नेते अब्दुल खादर हाजी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिच्याविरूद्ध कावरट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुल्ताना यांनी आपल्या या वक्तव्याचा बचाव केला आहे. ती म्हणाली, की तिचे हे म्हणणे पटेल यांच्या निर्णयावर आधारित आहे, देशाविषयी नाही.
"लक्षद्वीपवर कोविड -१९ची शून्य प्रकरणे होती. आता दररोज १०० प्रकरणांची नोंद होत आहे. असे आयशा सुल्ताना मल्याळम टीव्हीवरील चर्चेदरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणाली होती," असे अहवालात म्हटले आहे.
लक्षद्वीप बेटावर सुरू झालेल्या नव्या सुधारणांविरूद्धच्या मोहिमेमध्ये अभिनेत्री आयेशा सुल्तानाने भाग घेतला असून ती यासाठी सक्रिय बनली होती.
आयशा सुल्ताना कोण आहे?