मुंबई- बॉलिवूड स्टार शाहिद कपूर आणि तामिळ सुपरस्टार विजय सेतुपती एकत्र काम करीत असून राज आणि डीके यांच्या आगामी वेब शोचे ते गोव्यात शुटिंग करीत आहेत. या दोघांच्या भूमिका काय आहेत याबद्दलची माहिती अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मात्र त्या दोघांचे मानधन किती आहे या बातम्यांनी मथळे गाजवले आहेत.
गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात वेब सिरीजच्या टीमने गोव्यामध्ये शुटिंगला सुरुवात केली.
कबीर सिंगच्या यशानंतर, शाहिद कारकीर्दी सर्वोत्तम टप्प्यात आहे. अभिनेता शाहिद त्याच्या या शोमधून डिजिटल डेब्यू करणार आहे, ज्यासाठी त्याने ४० कोटी रुपये मानधन घेतले आहे. एका वेबसाईटच्या अहवालानुसार, शाहिदच्या करारामध्ये एक बाब समाविष्ट करण्यात आली असून शोच्या पहिल्या भागाला यश मिळाल्यानंतर दुसऱ्या भागात त्याचे मानधन वाढवले जाणार आहे. दुसरीकडे, याच शोसाठी दक्षिणेकडील प्रशंसित सुपरस्टार असलेला विजय हा ५५ कोटी रुपये घरी घेऊन जात असल्याची बातमी आहे.