महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘किचन कल्लाकार’मध्ये सिद्धार्थ जाधव, भाऊ कदमसह दिग्गजांची हजेरी!

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा एक अष्टपैलू कलाकार आहे पण आता तो किचन कल्लाकारच्या आगामी भागात येऊन आपली पाककला दाखवण्याचं शिवधनुष्य पेलवू शकेल की नाही हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता ‘किचन कल्लाकार’ मध्ये या कार्यक्रमात मराठीतील एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव हजेरी लावणार आहे आणि त्याच्यापुढे आव्हान असणार आहे कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढरा रस्सा बनवायचं.

किचन कल्लाकार’
किचन कल्लाकार’

By

Published : Jan 19, 2022, 12:05 AM IST

मुंबई - प्रत्येक वाहिनीवर पाककला विषयक कार्यक्रम येत असतात. हल्लीच झी मराठी ने ‘किचन कल्लाकार’ नावाचा कार्यक्रम आणला असून यात मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटीज भाग घेताना दिसताहेत. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. आता या कार्यक्रमात मराठीतील एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव हजेरी लावणार आहे आणि त्याच्यापुढे आव्हान असणार आहे कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढरा रस्सा बनवायचं.

झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. एनर्जीचं पावर हाऊस म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव हा एक अष्टपैलू कलाकार आहे पण आता तो किचन कल्लाकारच्या आगामी भागात येऊन आपली पाककला दाखवण्याचं शिवधनुष्य पेलवू शकेल की नाही हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

सिद्धार्थला ‘महाराज’ तांबडा पांढरा रस्सा बनवण्याचं आव्हान देणार आहेत. त्यावर सिद्धू आश्चर्यचकित होऊन आता काय करू आणि काय नको अशी प्रतिक्रिया देतो. आता सिद्धूला किचनमध्ये तांबडा पांढरा रस्सा बनवायला जमेल की महाराजांना एखादा वेगळाच पदार्थ खायला मिळेल हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल. सिद्धू सोबत या आठवड्यात सुयश टिळक, सायली संजीव, मृण्मयी देशपांडे, कार्तिकी गायकवाड आणि भाऊ कदम हे कलाकार या मंचावर हजेरी लावणार आहेत.

इतकंच नव्हे तर या आठवड्यात किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे सांभाळणार आहे. ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाचा आगामी भाग प्रसारित होणार आहे १९ आणि २० जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता झी मराठीवर.

हेही वाचा -Jai Bhim Video : 'जय भीम' चित्रपटाचा व्हिडिओ ऑस्करच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर

ABOUT THE AUTHOR

...view details