महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘द व्हाईट टायगर’मध्ये वर्गसंघर्षाचा थरार, ट्रेलर प्रदर्शित

राजकुमार राव आणि प्रियंका चोप्रा जोनास यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘द व्हाईट टायगर’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार झाला आहे. नेटफ्लिक्सने सोमवारी व्हाईट टायगरचा अडीच मिनिटांचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. अरविंद अडीगा यांनी लिहिलेल्या ‘द व्हाईट टायगर’मध्ये भारतातील वर्ग संघर्ष दाखवण्यात आलाय.

The White Tiger trailer
‘द व्हाईट टायगर’

By

Published : Dec 22, 2020, 1:14 PM IST

मुंबई- ‘द व्हाईट टायगर’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारित याच नावाचा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सने सोमवारी व्हाईट टायगरचा अडीच मिनिटांचा थरारक ट्रेलर प्रदर्शित केला आहे. राजकुमार राव आणि प्रियंका चोप्रा जोनास यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत.

अरविंद अडिगा यांनी लिहिलेल्या ‘द व्हाईट टायगर’मध्ये भारतातील वर्ग संघर्ष दाखवण्यात आलाय. एक श्रीमंत व्यक्ती आणि त्याच्या पत्नीचा ड्रायव्हर असलेल्या बलराम या गरीब व्यक्तीच्या दृष्टीकोनातून हा संघर्ष दाखवण्यात आलाय.

कथा जसजशी पुढे सरकते तसतशे त्या ड्रायव्हरच्या आयुष्यात धक्कादायक बदल घडतात. भारतातील दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि वर्गाची स्थिती यात दर्शवण्यात आली आहे.

हेही वाचा - 'डॉक्टर जी'मध्ये झळकणार आयुष्यमान खुराणा, अनुराग कश्यपचे बहिण करणार दिग्दर्शन

या चित्रपटात राजकुमार राव, महेश मांजरेकर आणि आदर्श गौरव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अमेरिकन-इराणी दिग्दर्शक रॅमिन बहरानी बहरानी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून २२ जानेवारी २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - कोरोना काळात अर्जुन रामपालने सुरू केले 'नेल पॉलिश'चे शुटिंग

ABOUT THE AUTHOR

...view details