मुंबई - बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक तिसराच ग्रुप तयार होताना दिसत आहे आणि तो म्हणजे जय, उत्कर्ष आणि स्नेहा यांचा. मात्र विकास उत्कर्ष, जयचा मुद्दा घरामध्ये नुकतीच एंट्री घेतलेल्या नीथासमोर मांडताना दिसत आहे. जय नीथाला सल्ला देताना दिसला उत्कर्ष तिला नक्की त्या दुसर्या ग्रुपमध्ये काय सुरू आहे, का त्यांची भांडण सुरू आहेत, हे सांगताना दिसला. तो म्हणाला, त्यांच्यामध्ये भांडण आहेत, मी बनणार की तू. त्यानंतर जय स्नेहाला म्हणाला, “मी आज तिला एक पिल्लू सोडलं आहे माझे तर दोघेही सेफ आहेत.
बिग बॉस मराठी सिझन तिसरा मधील ‘डब्बा गुल’ कार्यात धक्काबुक्की, टोमणे आणि राडे!
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन कार्य पार पडले. ही प्रक्रिया जरा अनपेक्षितरीत्या सदस्यांनी पार पडली. आता घरामध्ये रंगणार आहे “डब्बा गुल” हे साप्ताहिक कार्य. या कार्यामध्ये देखील दोन टीम असल्याचे दिसून आले.
नवा आठवडा नवा टास्क -
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन कार्य पार पडले. ही प्रक्रिया जरा अनपेक्षितरीत्या सदस्यांनी पार पडली. आता घरामध्ये रंगणार आहे “डब्बा गुल” हे साप्ताहिक कार्य. या कार्यामध्ये देखील दोन टीम असल्याचे दिसून आले. ज्यामध्ये सोनालीने मीनलला उत्तर दिले आहे “अजून खेळ सुरू व्हायचा आहे ना. महाभारत. ओढाताण, पाय खेचणे, धक्काबुक्की, शाब्दिक वार होताना दिसतं आहेत. टास्क दरम्यान पुन्हा एकदा भिडणार मीरा व मीनल. जिथे मीनल मीराला म्हणाली, “तू धक्काबुक्की का करतेस” त्यावर मीरा म्हणाली, “चल निघ...” दुसरीकडे, जयने नीथाला खेळ कसा पुढे जातो आणि कसा खेळावा हे सांगितले. ‘रिबिन तर कापायचीच आहे बॉक्सवरची, पण जर आपल्याकडे कमी आहे आणि त्यांच्याकडे जास्त तर “game is all about संचालक’, संचालक ठरवणार approve करायचे की disapprove करायचे. जर आपल्याकडे १० आहेत आणि त्यांच्याकडे १५ बॉक्स आहेत तर आपल्याला त्यांचे ५ आपल्याकडे आणायचे आहेत हा हेतु आहे. त्याच्यामध्ये खेचाखेची होणारच.”
मीराचे म्हणणे आहे, तिकडे (बॉक्स) आणल्या आणल्या सगळ्यांनी चालू करायचं गाठी मारायला. तर जय सांगत आहे, जेव्हा मी (बॉक्स) आणणार ना तेव्हा ते प्रोटेक्ट करण्यासाठी एक माणूस हवा तर दादूस देखील टीमला मदत करणार आहेत रस्सी बांधायला, गायत्री आहेच. कारण, मला असं दिसतं आहे शंभर टक्के विकास येणारच. जरी त्याच्याकडे जास्त असतील ना (बॉक्स) तरी तो येणारच. दादूस म्हणाले त्याच्या रक्तातच आहे ते, काहीना काही करायला तो येतोच. उत्कर्ष म्हणाला शंभर टक्के रिबिन कापायला येतील.
टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरीच धक्काबुक्की बघायला मिळाली. सदस्य एकमेकांना टोमणे मारताना दिसले. टास्कमध्ये झाले राडे. मीरा विरुध्द टीमला सांगताना दिसणार आहे, तुम्ही आरडाओरडा नका करू आम्ही पण नाही करणार. तुम्ही जर (बॉक्स) वरती टाकले तर आम्ही पण नाही allow करणार. मीरा हेदेखील बोलताना दिसली चढू वर टाकू दे रिजेक्ट आहेत ते, वरती जे टाकणार ते रिजेक्ट आहे.
हेही वाचा -देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी