मुंबई- २०१७मध्ये आलेल्या 'पोस्टर बॉयज' या कॉमेडी चित्रपटामध्ये दिसलेली अभिनेत्री समीक्षा भटनागर आगामी 'जो हुकुम मेरे आका' या वेबमालिकेत पुनरागमन करणार आहे. या शोमध्ये अभिनेता-कॉमेडियन कृष्णा अभिषेकसुद्धा आहे.
याबाबत समीक्षा म्हणाली, "शूट सुरू झाले आहे. हे एकदम डोके चक्रावून सोडणारे आणि आनंददायक आहे. आम्हाला एक उत्तम टीम मिळाली आहे आणि आम्ही अधिक उत्तम बनवण्यासाठी सज्ज झालो आहोत."