महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चित्रपटाशी संबंधित सर्वांना श्रेय मिळत नाही - जिम सर्भ

चित्रपट कलाकारांमुळे बनत नाही. चित्रपटासाठी असंख्य लोक मेहनत घेत असतात, पण आपल्याला कलाकार महान वाटायला लागतो. चित्रपट बनवणाऱ्या सर्वांना जास्त श्रेय दिले जात नाही, असे मत अभिनेता जीम सर्भ याने व्यक्त केलंय.

Jim Serbh
जीम सर्भ

By

Published : Oct 26, 2020, 4:24 PM IST

Updated : Oct 28, 2020, 12:21 PM IST

मुंबई- चित्रपट बनवणाऱ्या सर्वांना जास्त श्रेय दिले जात नाही, असे मत अभिनेता जीम सर्भ याने बोलून दाखवलंय. तो म्हणाला, ''प्रत्येकाला वाटते की, पृथ्वीवर कलाकार हे सर्वात महान आहेत, पण तसे नाही. हे सर्व चांगली कथा, चांगले दिग्दर्शन आणि ज्या प्रकारे एडिट केला जातो, या सर्व गोष्टी जुळून आल्याने चित्रपट चांगला बनतो.''

तो म्हणाला, ''चित्रपटाशी संबंधीत सर्वांना श्रेय दिले जात नाही. त्यामुळे मला वाटते की, स्वतःला प्रमुख मानणे बंद केले पाहिजे आणि चांगली कथा सांगण्याच्या संदर्भात अधिक विचार करणे सुरू केले तर सर्व गोष्टी ठीक होतील.''

जिम याने २०१६मध्ये 'नीरजा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 'पद्मावत', 'राब्ता', 'अ डेथ इन द गुंज', 'संजू' आणि 'हाउस अरेस्ट' यासारख्या चित्रपटात काम केले होते.

बॉलिवूडमध्ये काम करताना खूश आहेस का, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ''हे असं आहे की, जे काम होत आहे ते सर्वात चांगले करण्याचा प्रयत्न केला करतो. जितके मला शक्य आहे आणि एका वेगळ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतो.''

Last Updated : Oct 28, 2020, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details